

शेतकरी ॲग्री टुरिझम – अनुभव गावाचा, आनंद आपल्या मनाचा!
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या लहानपणीच्या आठवणी शोधणं म्हणजे स्वप्नवत झालंय – झाडाखाली चटणी-भाकरी, डोहात पोहणं, बैलगाडीची सफर, शेणमातीचा गंध… हीच आपली खरी संस्कृती आणि हाच आमचा उद्देश. शेतकरी ॲग्री टुरिझम ही संकल्पना नव्या पिढीला मातीशी जोडणारी, प्रत्येक वयोगटासाठी काही ना काही देणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. बालगोपाळांपासून ते आजी-आजोबांपर्यंत, प्रत्येकासाठी काहीतरी खास – खेळ, साहस, प्राणी, शेती, गप्पा, खमंग जेवण आणि आनंददायी अनुभव!





आमचा प्रवास...
आमच्याबद्दल जाणून घ्या
शेतकरी ॲग्री टुरिझम म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या खऱ्या सौंदर्याचा अनुभव घेण्याचं तुमचं प्रवेशद्वार. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आमचं शेत शहराच्या धावपळीच्या जीवनातून एक ताजंतवाना विरंगुळा देतं – बैलगाडी सफर, पारंपरिक शेत जेवण, गावठी खेळ, प्राण्यांसोबतचा संवाद आणि प्रत्यक्ष शेतीतील अनुभव. तुमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणं असो किंवा तुमच्या मुलांना मातीची ओळख करून देणं – आमचं शेत सर्व वयोगटांसाठी आनंद, शिकवण आणि विश्रांती घेऊन येतं. परवडणारी, कुटुंबासाठी योग्य, आणि आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडलेली ही सहल म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर मुळांशी पुन्हा एकदा नातं जोडण्याचा आत्मीय अनुभव आहे.

आमचे प्रेरणास्थान
स्वर्गीय श्री. बी. आर पाटील ( सर ) अण्णा
स्वर्गीय श्री. बी. आर. पाटील सर, म्हणजे अण्णा – एक आदर्श शिक्षक, प्रयोगशील शेतकरी आणि निस्वार्थी समाजसेवक. गरिबीतून, संघर्षातून त्यांनी आपल्या प्रामाणिक आणि कष्टाच्या बळावर एक जीवनदृष्टी निर्माण केली. शिक्षण, शेती आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी जे मूल्याधिष्ठित कार्य केले, त्यातूनच आजही आमच्या वाटचालीला नवी प्रेरणा मिळते.
"शून्यातून जग उभारणारा विचार, निस्वार्थ वृत्ती आणि आधुनिकतेची जाणीव – हीच आमची खरी प्रेरणा."


.jpg)







